Ad will apear here
Next
‘मानव उत्थान’ने गरिबांना दिली मायेची ऊब
मानव उत्थान मंचातर्फे रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना ब्लँकेट्सचे वाटप करताना संस्थेचे कार्यकर्ते.नाशिक : नाशिक रोड येथील मानव उत्थान मंचातर्फे रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना अनाथांना सहाशे ब्लॅंकेट्स व गोधड्यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या कृतीने भर थंडीत गरिबांवर मायेची ऊब पांघरली गेली.

या बाबत बोलताना संस्थेचे संस्थापक जगबीर सिंग म्हणाले, ‘आगामी काळात गोदाघाट परिसरातील अनाथांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तात्पुरते निवारागृह चालू करण्याचा निर्धार केला आहे. थंडीच्या दिवसात आपल्या घरातील जुने अथवा वापरात नसलेले कपडे गरिबांना घालायला दिले पाहिजे.’

पहिल्या टप्प्यात उपनगर, पपया नर्सरी व त्र्यंबकेश्वर बसस्थानक या परिसरात ब्लॅकेंट वाटप झाले. दुसऱ्या टप्प्यात पंचवटी, अमरधाम, गोदाघाट येथील गौरी पटांगण व भाजी बाजार परिसरात रात्री ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आला. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी बेघरांच्या राहण्याचे ठिकाण, त्यांची संख्या व त्यांच्या गरजा यांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे केला. त्यानंतर वाटप करतेवेळी महिला व पुरुषांना वयानुरूप कुपनचे वाटप करण्यात आले. मग प्रत्यक्ष ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. दोन्ही दिवस मिळून एकूण ५०० ब्लॅंकेट्स वाटण्यात आले; तसेच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या ८० गोधड्यांचेदेखील वाटप करण्यात आले.

यासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी एक लाख दहा हजारांची मदत केली. ब्लॅंकेटसोबतच बेघरांच्या मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान लाभार्थींचा डिजिटल पद्धतीने अभिप्राय नोंदवून घेण्यात आला. समाजात नेहमीच दुर्लक्षित असलेल्या गरीब बेघरांना ‘बिइंग सांता’च्या माध्यमातून उब मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य नव्या कामासाठी ऊर्जा देणारे होते, असे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या उपक्रमात जसमीत शेमी, खुशबू शर्मा, स्वप्नील घिया, गौरी सालकर, सौरभ आडके, साक्षी कांत, टिना शेमी, डिंपल माणकू, अर्चना सराफ, अनिल सिंग, विष्णू नायर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNNBV
Similar Posts
‘मानव उत्थान’तर्फे प्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयाला पत्र नाशिक रोड : नाशिकमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नागरिकांना व प्राणीमात्रांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक रोडच्या मानव उत्थान मंचच्या माध्यमातून शंभर नागरिकांनी उच्च न्यायालयाला पत्रे लिहिली आहेत.
नाशिकमध्ये फुटपाथवर राहणाऱ्यांना मानव उत्थान मंचातर्फे ड्रायफ्रूट्सचे वाटप नाशिक : नाशिकमधील मानव उत्थान मंचातर्फे दिवाळीनिमित्त ‘शेअरिंग जॉय’ या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झोपडपट्ट्या आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना मिठाई आणि ड्रायफ्रूट्सचे वाटप करण्यात आले. या अनोख्या संकल्पनेला
नाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची
स्मृतिभ्रंश दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती नाशिक : स्मृतिभ्रंश दिनानिमित्त येथील युवा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्मृतिभ्रंशासंदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. नाशिक रोडच्या सिग्नलवर, तसेच रस्त्यावर हातात पोस्टर घेऊन स्मृतिभ्रंशाची लक्षणे आणि कारणे यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language